ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी “या” प्रकरणी कोर्टात मागीतली माफी

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणावरून एनसीबीचे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकापाठोपाठ आरोप करून धुरळा उडवून दिला होता. आता हायकोर्टामध्ये आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर केलेल्या काही आरोपांमुळे दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. तसंच, यापुढे कोणतेही विधान करणार नाही, अशी हमी दिली.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि कुटुंबांवर वेगवेगळे आरोप केले होते. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी आर्यन खानला केलेली अटक ही बनावट असल्याचं सांगत अनेक पुरावे सादर केले होते. एवढंच नाहीतर समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावाच करत त्यांनी अनेक फोटो आणि कागदपत्र ट्वीट केले होते. त्यामुळे वानखेडे कुटुंबीयांनी बचावासाठी कोर्टात धाव घेतली होती.

 

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. मलिक यांच्याविरोधात १ कोटी २५ लाखांचा अब्रूनुकसानीचा दावा केला आहे. तसंच, मलिक यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यास मनाई करावी अशी मागणीही त्यांनी केली होती. आज या प्रकरणी मलिक यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

या चार पानाच्या प्रतिज्ञापत्रात नवाब मलिक यांनी मुंबई हायकोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे. वानखेडे यांच्या कुटुंबावर मी कोणतेही व्यक्तिगत आरोप केले नाही. त्यांच्याकडे दे पद आहे, त्याचा दुरुपयोग केला म्हणून मी आरोप केले होते. यापुढे कोणतीही विधाने करणार नाही, अशी हमीच मलिक यांनी कोर्टात दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!