सोलापूर : सोलापूर ते विजापूर राष्ट्रीय महामार्गावर अकरा मैल ते तेरा मैलच्या दरम्यान कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातामध्ये अर्चना दशरथ मरीआई वाले या २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून चौदा जण जखमी झाले आहेत. यामध्ये सहा लहान मुले आहेत तर आठ प्रौढ व्यक्तींचा समावेश आहे. या आठ जणांपैकी सात महिला एक पुरुष आहे.
जखमींमध्ये शंकर मरीआईवाले (वय-३०), तानु संजय मरीआईवाले (वय-२५), गीता विजय मरीआईवाले (वय-३०), नकुशा संजय मरीआईवाले (वय-३०), अंकुश राठोड (वय-२५) , संगीता लखन मरीआईवाले (वय-२०), जयश्री संजय मरीआईवाले (वय-१८), रेश्मा भारत मरीआईवाले (वय-२४) या महिलांचा समावेश आहे.
तर संस्कार मरिआई वाले (वय वर्षे-२), नितीन शंकर मरीआई वाले (वय वर्षे-१), आयुष्या संजय मरीआई वाले (वय वर्षे-४), अंकिता भगवान मरीआई वाले (वय वर्षे-३), आरती पोपट मरिआई वाले (वय वर्षे-२), दीपक भगवान मरीआई वाले (वय वर्षे-४), या लहान मुलांचा समावेश आहे.
रिक्षा क्रमांक एमएच-१३ सीटी-५६४९ आणि कार क्रमांक एमएच-१५ जीएल-१४२२ यांची चौधरी हॉस्पिटल जवळ आल्यानंतर धडक झाली. रिक्षातील सर्व प्रवासी हे आपल्या गावी जात होते.