ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है – नवाब मलिक

मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या एका सुचक ट्विट केले आहेत. या नव्या ट्विट्मुळे चर्चाना उधाण आली आहे. मंत्री नवाब मलिक यांनी कालच मुंबई उच्च न्यायालयात एनसीबीचे अधिकारी समिर वानखेडे यांच्या विरुद्ध केलेल्या वक्तव्यांबद्दल माफीनामा जाहीर केला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री नवाब मलिकांनी एक नवा ट्विट करून दावा केले आहेत. ते या ट्विट असे म्हंटले आहेत की “साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. या दाव्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडे ते बोट दाखवत असल्याचे मानले जात आहे.

नवाब मलिक यांनी ट्विट करून लिहिले, ‘ऐकले आहे की आज ना उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो. मलिक यांनी पुढे लिहिले की, आम्हाला त्यांच्यापासून घाबरण्याची गरज नाही, तर लढायचे आहे. गांधी गोर्यांयशी लढले आणि आपल्याला चोरांशी लढायचे आहे. या त्यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!