ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना काँग्रेस हायकमांडने दिला मोठा दणका, राऊतांकडुन काढुन घेतले “हे” पद

मुंबई : काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांना काँग्रेस हायकमांडने मोठा दणका दिला आहे. राऊत यांच्याकडे काँग्रेस SC विभागाचे अध्यक्षपद होतं. याबाबत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून पत्रक जाहीर करण्यात आल असून, त्यांच्या जागी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार राजेश लीलोठीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव के. एस. वेणुगोपाल यांनी याबाबत पत्र जारी केले आहेत. नितीन राऊत यांच्या बाबतचा हा निर्णय काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार या पदावरून हटवण्यात असल्याची माहिती काँग्रेसकडून मिळत आहे.

कायम विधाने आणि भाषणांमुळे चर्चेत राहणारे नितीन राऊत यांना अचानक या पदावरून काढून टाकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मतभेद झालेले पाहायला मिळाले.

के.एस. वेणुगोपाल यांनी हे पत्रक जाहीर केलं असून, राजेश लीलोठीया यांची अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी तर, तर के. राजू यांची काँग्रेसच्या अनुसूचित जाती ओबीसी, आदिवासी विभागाच्या कामकाजाची देखरेख करण्यासाठी निवड करण्यात आली असून त्यांच्याकडे समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!