राज्य सरकार व एसटी महामंडळाच्या वादात विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, स्टुडंट्स ऑफ फेडरेशनच्यावतीने तहसीलदारांना निवेदन
सचिन पवार
कुरनूर,दि.४ : गेल्या अनेक दिवसांपासून विविध मागण्यासाठी संप पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा फटका सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांना बसत आहे.यामुळे पर्यायी व्यवस्था तरी उभी करावी, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात एसटी सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे खुप हाल होत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थी जात असतात.परंतु हे सर्व बंद आहे.अशातच दहावी बारावीचे वर्ग सुरू असताना शाळा-महाविद्यालय वेळेवर पोहचता येत नाही. त्यामुळे घरीच बसून राहावे लागत आहे.
यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे.याला जबाबदार कोण असा सवाल पालकांमधून विचारला जात आहे. त्यामुळे खाजगी वाहनांचा धोका पत्करून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. खासगी वाहनांमधून प्रवास करत असताना बरेवाईट झाल्यास आम्ही कोणास जाब विचारायचे असा देखील प्रश्न विचारला जात आहे.एसटी कधी सुरू होईल.याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
यावेळी केदार मोरे, मनोज सुरवसे, अभिजीत काळे, आकाश वसईकर, अमर दगडे आदी उपस्थित होते.
अन्यथा आंदोलन करू
सर्व समस्यांचा विचार करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तात्काळ एसटी सेवा सुरू करावी अन्यथा शाळा, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल – विश्वजित बिराजदार,उपाध्यक्ष स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया