सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील जमीन खरेदीच्या व्यवहारात ठरलेल्या व्यवहारा प्रमाणे पैसे न देता ४ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक पडळकर बंधूंनी केल्याची तक्रार महादेव वाघमारे यांनी केली आहे.
या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मदेव पडळकर यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. वाघमारे व पडळकर यांच्यामध्ये ६ लाख २० हजार रुपयांत जमीन खरेदीचा व्यवहार ठरला.
पडळकर बंधूंनी २१ मा र्च २०११ मध्ये ज मीन खरेदीचा दस्त करून घेतला होता. त्या वेळी त्यांची बनावट कागदपत्रे तयार करून वाघमारे यांना १ लाख ६० हजार रुपये दिले. उर्वरित रक्कम नंतर तीन ते चार महिन्यांत देण्याचे ठरले होते. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने अखेर वाघमारे यांनी पोलिसांत तक्रार केली.