अक्कलकोट तालुक्यात जलजीवन मिशन व रस्त्यांच्या कामासाठी ७ कोटींचा निधी मंजूर; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची माहिती
अक्कलकोट, दि.११ : हर हर घर को नल या संकल्पनेतून जलजीवन मिशन योजना राज्य शासनाकडून राबविली जाते.या योजनेंतर्गत प्रत्येक घरास नळ व शुध्द पाण्याचा पुरवठा करण्याचा संकल्प आहे. या योजनेंतर्गत मागणी केल्याप्रमाणे महाविकास आघाडीने अक्कलकोट तालुक्यास मोठे सहकार्य करत जवळपास ३ कोटी ९५ लाख तर जिल्हा नियोजन समितीकडून तालुक्यांतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी ३ कोटी असे एकूण ७ कोटी रूपयांचा मोठा निधी मंजुर झाल्याचे माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी सांगितले.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत व्हावा,या उद्देशाने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सरकारकडे मागणी केली होती. यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून या योजनेंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील कडबगांव-सेवालालनगरसाठी ४७ लाख ६५ हजार रू,घोळसगांवसाठी ३९ लाख ४८ हजार रू,किणीसाठी ७८ लाख ५ हजार,चपळगावसाठी ४० लाख ५३ हजार,पितापुरसाठी २९ लाख ३० हजार,बऱ्हाणपूरसाठी ३३ लाख ६४ हजार,अक्कलकोट शहरासाठी १कोटी ७ लाख, निमगावसाठी १९ लाख ३५ हजार,रामपुरसाठी २० लाख २५हजार रू असे एकुण ३ कोटी ९५ लाख १४ हजार ६४५ रू एवढा मोठा निधी महाविकास आघाडीने मंजुर केला आहे,अशी माहिती म्हेत्रे यांनी दिली.तर जिल्हा नियोजन समितीच्या योजनेतुन रस्ते विकासासाठी ३ कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे.
३०५४ योजनेंतर्गत संगोगी-इब्राहिमपूर, आंदेवाडी – बबलाद, दुधनी – निंबाळ, सलगर – भिमपूर, गौडगाव – प्रजिमा ५२(जेऊर), जेऊर – डिग्गेवाडी, सांगवी खु – गोसावी, लवटेवस्ती,धारसंग कल्लकर्जाळ, गौडगांव बु – शिवगोंड तांडा, किणीवाडी – नांदगाव, गौडगाव बु – प्राजिमा ५२,आंदेवाडी – हिळ्ळी, किणीवाडी पालापूर – चुंगी बोरगांव या रस्त्यांना मिळणारा पालापुरजवळचा रस्ता,सलगर – भिमपुर, जेऊर – कोन्हाळी, बोरगाव दे-किरनळ्ळी,गोगाव पडसलगी रस्ता तर ५०५४ योजनेंतर्गत कल्लकर्जाळ-प्रजिमा ५९ ला जोडणारा रस्ता,तोळणूर -बोरोटी- आंदेवाडी – दुधनी, शिरवळ-बणजगोळ,हालचिंचोळी – प्रजिमा ५२, अक्कलकोट-तामतानळ्ळी-गुरववाडी – व्हसुर, तोळणूर-आंदेवाडी दुधनी, सुलेरजवळगे – अंकलगी, हंजगी ब्यागेहळ्ळी – अक्कलकोट या गावांना निधी मिळणार आहे.मागणी केलेल्या सर्व कामांच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसुल मंत्री बाळासाहेब थोरात,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,पालकमंत्री दत्तात्रय भरणे आदींनी सहकार्य केल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले. सदरची कामे लवकरच सुरू होणार असून यातून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
◆ महाविकास आघाडीचे तालुक्याला सहकार्य
महाविकास आघाडीने अक्कलकोट तालुक्यासाठी न भुतो न भविष्यती अशी मदत केली आहे.आम्ही मागणी केल्याप्रमाणे ठाकरे सरकारकडून यापूर्वीच एकरूखची योजना पूर्णत्वास जाण्यासाठी ५० कोटी रूपये मंजूर झाले आहेत.आता तालुका दुष्काळमुक्त होण्यासाठी पाणीपुरवठा योजनेतुन पून्हा मदत झाली आहे.सर्व निधी हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळत आहे – सिद्धाराम म्हेत्रे,माजी मंत्री