सचिन पवार
कुरनूर दि.१३ : ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वारंवार सूचना देऊन देखील जर कुरनूर मध्ये अवैध धंदे सुरू असतील त्यांचा बीमोड करण्यासाठी व्यंकट मोरे हा सदैव खंबीर आहे. या चौकाच नाव मी छत्रपती शिवाजी महाराज चौक ठेवला आहे. आणि जर या चौकांमध्ये अशा प्रकाश धंदे सुरू असतील तर गावाच्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट अशी बाब आहे. आणि हे सहन केलं जाणार नाही. या चौकातील अवैध धंदे बंद करा अन्यथा कायद्याचा आधार घेऊन या धंद्यांचा बिमोड केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असा इशारा विद्यमान सरपंच व्यंकट मोरे यांनी दिला आहे. ते राजमाता जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमोल हिप्परगी उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या हस्ते आदर्श पालक पुरस्कार म्हणून पांडुरंग बंडगर यांना गौरविण्यात आले असून युवा उद्योजक म्हणून केदार मोरे यांना बनाजी बोळकोटे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. प्रतिष्ठान प्रत्येक वर्षी शिक्षणासाठी गावातील हुशार आणि होतकरू मुलांना दत्तक म्हणून घेत असते. यावेळी देखील दोन विद्यार्थ्यांना प्रतिष्ठाने दत्तक घेऊन तीन वर्षासाठी शालेय शिक्षणाचा खर्च देखील प्रतिष्ठान उचलणार आहे. आणि गावासमोर आणि समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.
कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मनोज सुरवसे, गोपाळ बिराजदार, अमर दगडे, ज्ञानेश्वर बिरादार, अभिषेक काळे, किरणे येवते, आधी शिवप्रेमींनी परिश्रम घेतले.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणखीन विद्यार्थ्यांना दत्तक घेणार
मिरवणुकीचा वायफळ खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिष्ठान चा आहे. गावातील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रतिष्ठान सदैव प्रयत्नशील आहे. आणखीन विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च प्रतिष्ठान उचलणार आहे – विश्वजीत बिरादार अध्यक्ष- राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान