ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात लस घेणं बंधनकारक नाही; मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी लस घेणे नागरिकांना भाग पाडू – आरोग्यमंत्री

जालना : कोरोना लस सक्तीची नसल्याचं केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. मात्र, राज्य सरकारची याबद्दलची सक्तीची भूमिका आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकांनी नियम पाळल्यास राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येईल आणि राज्यात लागू केलेले निर्बंध मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून कमी करण्यात येतील. असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले कि, राज्यात लसीकरण समाधानकारक असून, लसीची सक्ती नसली तरी आम्ही नागरिकांना विनंती करू. तसेच, त्यांना लस घेण्यास भाग पाडू, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

उद्यापासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरु होत आहे. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडेही लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!