ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उद्धव ठाकरे यांच्या टिकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांच प्रत्युत्तर, आजी-माजी मुख्यमंत्र्यामध्ये जुगलबंदी

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी ऑनलाईनच्या माध्यमातुन शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. युतीत आपली २५ वर्षे युतीत सडली. तीच माझी भूमिका आणि मत आजही कायम आहे. मी त्या मतावर ठाम आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार करण्याबरोबरच काही सवालदेखील उपस्थीत केले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुमारे २०१२ पर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. त्यांच्या युतीच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवताय का, बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले, असे तुमचे म्हणणे आहे का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

तुम्ही साधे औरंगाबादचे संभाजीनगर केले नाही. उस्मानाबादचे धाराशिव करू शकले नाही. या तुमच्याच घोषणा होत्या ना? तिकडे भाजपाने अलाहबादचे प्रयागराज करून दाखवले. त्यांनी करून दाखवले, तुम्ही बोलत राहिलात! हिंदुत्व जगावे लागते. भाजपाचे हिंदुत्व भाषणापुरते मर्यादित नाही; मोदींनी ते करुन दाखवले. तसेच शिवसेनेचा बालेकिल्ला अशी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करणे हा शिवसेनेचा अनेक वर्षांपासूनचा अजेंडा आहे. निवडणुका आल्या की हा मुद्दा पक्षीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये उचलून धरला जातो. निवडणुका झाल्या की बारगळतो, असंही फडणवीस म्हणाले.

काल आम्ही बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ट्वीट केलं, मात्र सत्तेसाठी ज्या काँग्रेसशी हातमिळवणी केली, त्याच गांधी कुटुंबीयांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी एक ट्विट तरी केले का? याला लाचारी म्हणतात, असं फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!