---Advertisement---

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. यडीयुरप्पा यांच्या नातीने केली आत्महत्या

Follow Us:
---Advertisement---

बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. यडीयुरप्पा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बी.एस. यडीयुरप्पा यांची नात डॉ.सौंदर्या (वय ३०) हिने बंगळुरूमधील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे.

डॉ. सौंदर्या ही येडियुरप्पा यांची लहान मुलगी पद्मा यांची मुलगी आहे.डॉ. सौंदर्य बंगळुरूमधील एम. एस.रामय्या रुग्णालयात डॉक्टर होती. प्राथमिक अहवालानुसार ती बेंगळुरू येथील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

डॉ. सौंदर्या मागील काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती अशी माहिती आहे, आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी केली हे तपासण्यासाठी शवविच्छेदनसाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!