नोएडा : आयकर विभागाला नोएडा येथील माजी आयपीएस अधिकारी राम नारायण सिंह यांच्या घरातील लॉकरमधून कोट्यवधी रुपयांची रोकडच नाही तर सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिनेही मिळाले आहेत. या लॉकर्समध्ये सोन्याच्या विटा आणि बिस्किटेही जप्त करण्यात आली आहेत. या दागिन्यांची किंमत कोट्यवधी रुपये आहे. यामध्ये दागिने, हिरे, मोती, चांदी आणि सोने यांचा समावेश आहे.
आयकर विभागाच्या पथकाने लॉकरमधील सोन्याची वीटही जप्त केली आहे. आश्चयर्याची बाब म्हणजे या दागिन्यांचा आणि रोख रकमेचा दावा करणारा कोणीही अद्याप समोर आलेला नाही. सोन्याच्या विटांची किंमत सुमारे ४५ लाख रुपये आहे, तर उर्वरित दागिन्यांची किंमत अडीच कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
यापूर्वी प्राप्तिकराच्या छाप्यांमध्ये लॉकरमधून सुमारे ६ कोटी जप्त करण्यात आले होते. दावेदार आणि या रोख रकमेचा हिशेब देणारे अद्याप आयकरासमोर आलेले नाहीत. त्यामुळे हा पैसा काळा पैसा मानून जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासोबतच दागिन्यांसाठी एकही दावेदार पुढे आलेला नाही.
सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे असे सर्व दागिनेही आयकर विभाग सरकारी संरक्षणात ठेवणार आहेत. उल्लेखनीय आहे की माजी आयपीएसच्या घरात ६५० लॉकर्स आहेत. यामध्ये सुमारे २० जण संशयास्पद आढळले असून, त्यापैकी सध्या ६ लॉकर फोडून तपास पुढे नेण्यात आला आहे.