ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उत्तर प्रदेशः पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत फक्त ७.९३ टक्के मतदान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मतदारांना मतदान करण्याचे आवाहन

उत्तर प्रदेश : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात झाली असून उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील ११ जिल्ह्यांतील ५८ जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 623 उमेदवार रिंगणात आहेत. सर्व जागांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटलं की, ‘उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा आज पहिला टप्पा आहे. मी सर्व मतदारांना कोविडच्या नियमांचे पालन करून लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन करतो. लक्षात ठेवा – आधी मतदान करा, मग अल्पोपहार! अस ट्विट पंतपधान नरेंद्र मोदी यांनी केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!