ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ब्रेकिंग! राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माहिती लपवणं पडलं महागात

अमरावती :राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला आहे. बच्चू कडू यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅटबद्दलची माहिती लपवणं बच्चू कडूंना महागात पडल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बच्चू कडू यांनी मुंबईत म्हाडाच्या यत्रणेकडून २०११ मध्ये ४२ लाख ४६ हजार रुपयांत फ्लॅट विकत घेतला होता.

बच्चू कडू यांच्याविरोधात या प्रकरणी तक्रार करणारे तत्कालीन नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी माहिती अधिकार कायद्यान्वे संबंधित यंत्रणेकडून माहिती मिळवली होती. त्यातून हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, बच्चू कडू यांनी त्यावेळी या प्रकरणातील सर्वा आरोप फेटाळले होते.

भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी २०१७ मध्ये बच्चू कडू यांच्याविरोधात याप्रकरणी तक्रार केली होती. बच्चू कडू यांनी मुंबईत ४२ लाख ४६ हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असतानाही २०१४ ची विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली नाही, असा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता. याच आरोपांवरुन २०१७ मध्ये कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वे गुन्हा दाखल झाला होता.

बच्चू कडूंनी १९ एप्रिल २०११ रोजी त्या फ्लॅटचा ताबा घेतला होता. त्यानंतर बच्चू कडूंनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये त्यांनी मुंबईतील त्या मालमत्तेविषयी माहिती निवडणूक आयोगाला देणे टाळले होते. त्याच गोष्टीचा धागा पकडत तक्रारदारांनी बच्चू कडूंकडून आयोगाची दिशाभूल झाल्याचा ठपका ठेवत तक्रार केली होती. या प्रकरणी गेल्या पाच वर्षांपासून सुनावणी सुरु होती. अखेर कोर्टाने बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!