ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खंडोबाच्या भंडाऱ्यात न्हाली अवघी अक्कलकोट समर्थ नगरी ! जेजुरीच्या स्वामी पादुकांचे भक्तिमय वातावरणात स्वागत        

 

मारुती बावडे

अक्कलकोट,दि.२७ : जयाद्री ते प्रज्ञापुरी अर्थात जेजुरी ते अक्कलकोट या चरण पादुका रथ सोहळ्याचे अक्कलकोट समर्थ नगरीमध्ये भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.खंडोबाच्या भंडाऱ्यात न्हाली अवघी,अक्कलकोट समर्थ नगरी असेच काहीसे चित्र यावेळी पाहायला
मिळाले.भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करत स्वामी भक्तांनी अक्कलकोट नगरीत अक्कलकोटी आल्याचा आनंद व्यक्त
केला.यावेळी शेकडो भाविकांना मोफत अन्नदान, बस प्रवास ,निवास सुविधा देत जयाद्रीच्या स्वामीमय पादुका या दर्शन घेऊन पुन्हा कडेपठारकडे रवाना झाल्या.

यात टेंभुर्णी येथील स्वामी भक्त सुनील जाधव ,सोलापूरचे बाळासाहेब गायकवाड,रवींद्र सुतार, मोरगावचे अनिल शितोळे,मुंबईचे गोकुळ भोर,सासवडचे चंदू गिरमे,जेजुरीचे संतोष खोमणे या अन्नदात्यानी अन्नसेवा केली.सुमारे सहाशे किलोमीटरच्या प्रवासात स्वामींच्या पादुकांचे पौरोहित्य नयन गुरव गुरुजी यांनी केले.हा सोहळा प्रज्ञापुरीमध्ये पोहचताच सर्व भक्तगणांकडून खंडोबाला प्रिय असलेल्या हळद भंडाऱ्याची उधळण केल्यामुळे अवघी समर्थ नगरी स्वामीमय झाली होती.गेल्या दोन वर्षानंतर खंडीत
झालेला जेजुरी ते अक्कलकोट स्वामीमय सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला.जेजुरीहून सुमारे पाचशेहून अधिक भाविकांना मोफत बस सेवा, निवास
सुविधा देत हा पालखी सोहळा निघाला होता.अक्कलकोट नगरीत असलेल्या खंडोबा मंदिरातून स्वामी चरण पादुका परमपूज्य गुरू आणणू महाराज पुजारी, दत्ता महाराज
जगताप आणि स्वामीमय सेवा ट्रस्टचे संस्थापक
भगवान डिखळे, विश्व हिंदू परिषदेचे राजू चौधरी,पोपट खोमणे यांच्या उपस्थितीत वाजत गाजत भंडारा उधळत समाधी मठाकडे रवाना झाला.

दुसऱ्या दिवशी अनेक मान्यवरांच्या हस्ते धार्मिक विधीपूर्व वातावरणात अभिषेक,रुद्रपठण करीत भाविकांनी समाधी स्थळाचे दर्शन घेतले.या धार्मिक सोहळ्यात जेजुरी खंडोबा भक्त सेवेकरी कृष्णा कुदळे,जालिंदर खोमणे,गौरव घोडे यांना श्री स्वामी सेवा सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गेल्या वीस वर्षांपासून या स्वामीमय आनंद सोहळयाचे आयोजन स्वामीमय सेवा ट्रस्टचे अध्यक्ष भगवान डिखळे,माउली खोमणे, कार्याध्यक्ष गणेश मोरे,जेष्ठ पत्रकार विजयकुमार हरीचंद्र,डॉ.गोरव नानोटी,संतोष मोरे,संतोष खोमणे नितीन कदम, कबीर मोरे, महेश कदम, तुषार हेंद्रे,संदीप गायकवाड, नयन गुरव हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!