युक्रेनहुन प्रत्येक भारतीय सुखरूप पोहोचण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध – खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामी;युक्रेनहुन परतलेल्या सोलापुरातील विद्यार्थिनींचे केले स्वागत ; तेथील परिस्थितीची घेतली माहिती
सोलापूर — देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल निती व काटेकोर नियोजन यामुळे रशिया – युक्रेन युद्धात भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. उर्वरित सर्वच विद्यार्थी भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार भक्कमपणे काम करीत आहे. भारतीय जवान, विमानसेवा यांचे विशेष आभार मानत खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामी यांनी युक्रेनहुन परतलेल्या सोलापुरातील विद्यार्थिनींचे स्वागत केले.
सोलापूर शहर-ग्रामीणमधील तरुण-तरुणी युक्रेनमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने गेले होते. रशियाच्या हल्ल्यानंतर घाबरलेल्या त्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. रविवारी सोलापूर जिल्ह्यातील मुली त्यांच्या घरी सुखरूप पोहचल्या. यामध्ये सलोनी गेंगाणे (रा. सोलापूर), अंकिता अनिल शहापुरे (सोलापूर) यांनी दोन्ही कन्येचे खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामी यांनी स्वागत करीत परिस्थितीची विस्तृत माहिती घेतली. केंद्र सरकार विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुशल नेतृत्वाने केवळ भारतीय विद्यार्थी सुरक्षित मायदेशी परतले आहेत तसेच काही विद्यार्थी परततील असा विश्वास यावेळी विद्यार्थीनींनी व्यक्त केला.
वैद्यकीय शिक्षणाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील २० मुले व ११ तरुणी युक्रेनमध्ये वास्तव्यास आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर असंख्य लोकांनी जीव वाचविण्याच्या निमित्ताने युक्रेनमधून स्थलांतर केले आहे. रशियाने अजूनही हल्ला सुरुच ठेवला आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकार भारतीतील तरूण-तरुणींना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यात महाराष्ट्रातील जवळपास बाराशे तरुण-तरुणी असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील ३१ जणांचा समावेश आहे.
त्यामध्ये सांगोल्यातील चार, सोलापूर शहरातील पाच, पंढरपूर तालुक्यातील नऊ, मोहोळ तालुक्यातील दोन, मंगळवेढ्यातील पाच, बार्शीतील तीन आणि माढा, दक्षिण सोलापूर व करमाळ्यातील प्रत्येकी एक तरुण युक्रेनमध्ये आहेत. त्यातील आतापर्यंत ‘ऑपरेशन गंगा’च्या माध्यमातून त्यांना मायदेशी आणले जात आहे.
нож выкидной http://www.knifetop.ru.