अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील जागृत श्री दत्त मंदिर देवस्थानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्धापन दिन व नाथषष्ठी आणि लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्याला बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.या उत्सवात हजारो भाविक मोठ्या
संख्येने सहभागी झाले होते.श्री दत्त मंदिर समिती व कुरनूर ग्रामस्थांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
आहे.पहाटे ५ वाजता श्री दत्त मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावरून विविध भजनी मंडळ व मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून नगर प्रदक्षिणा घालण्यात आली.सकाळी १० वाजता श्री दत्त मूर्तीला अभिषेक
करण्यात आला.दुपारी १२ वाजता संत एकनाथ महाराजांचा गुलाल सोहळा पार पडला.या कार्यक्रमाचे परमपूज्य आणणू महाराज (पुजारी) समाधी मठ अक्कलकोट,प्रसाद कुलकर्णी,सोमनाथ हिरोळीकर यांनी पौरोहित्य केले.दिवसभर परिसरातील भजनी मंडळांचा कार्यक्रम पार पडला.१२ ते रात्री ९ वाजे पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी श्री दत्तजयंती,गोकुळाष्टमी या मुख्य कार्यक्रमांसह मंदिरांमध्ये नित्यनियमाने भजन कार्यक्रम होत असतात परंतु या वर्षीपासून वर्धापन दिन सोहळा आणि श्री नाथषष्टी साजरा करण्याचे नियोजन ग्रामस्थांनी केले होते.त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी ह.भ.प बाबुराव शिंदे,मंदिर समितीचे अध्यक्ष मारुती बावडे,तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे,भागवत पोतदार,अशोक काळे,परशुराम बेडगे,तुकाराम जावीर,नारायण चेंडके,सुरेश बिराजदार,गोपीनाथ निंबाळकर, नागनाथ मोरे,राजू पोतदार,दिलीप पोतदार,अर्जुन मोरे,भीम कुंभार, रवी सलगरे,लक्ष्मण सुरवसे,शिवाजी राजगुरू, स्वामीराव शिंदे, आप्पा मुरूमकर, सतीश सलगरे, मल्लिकार्जुन कुंभार,सुहास कुंभार,अप्पू काळे,हर्षद पटेल,रामा खांडेकर,तानाजी शिंदे, निरंजन बंडगर,रामेश्वर सुरवसे,गोविंद चव्हाण (चुंगी), मोहन चव्हाण (चुंगी),नेताजी मोरे,बाळू मोरे,पुजारी धोंडिबा धुमाळ,बाळू कुंभार आदी उपस्थित होते.
२८ वर्षानंतर होणार
लक्ष्मण शक्ती सोहळा
विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री दत्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच मंदिरामधील गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.गावामध्ये १९९३ नंतर पुनर्वसन गावात प्रथमच लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे महिला वर्ग व ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.