लोकनेते ब्रह्मानंद मोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ५ एप्रिलपासून कुरनूरमध्ये कार्यक्रम,६ एप्रिलला ह.भ.प माऊली महाराज पठाडे यांचे किर्तन
अक्कलकोट, दि.२२ : लोकनेते कै. ब्रह्मनंद
मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्यावतीने कुरनूर (ता.अक्कलकोट) येथे ब्रह्मानंद मोरे यांच्या
२३ व्या पुण्यस्मरणानिमित्त ५ एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिली.
यानिमित्त मंगळवार दि.५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ४
या वेळेत अंबाबाई मंदिर येथे रक्तदान शिबिर होईल.त्याचे उद्घाटन अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या हस्ते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसभापती स्वामीराव पाटील हे राहणार आहेत.यावेळी उद्योजक विश्वनाथ भरमशेट्टी,शेतकरी संघटनेचे नेते अमोल हिप्परगे,माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवठे,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्रा.प्रकाश सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तर सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध किर्तनरुपी व्याख्याते अविनाश भारती (आंबेजोगाई) यांचे ‘आई-वडील हेच आमचे दैवत’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
याचे उद्घाटन फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव माने यांच्या हस्ते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे हे राहणार आहेत.बुधवार दि.६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता दत्त चौक येथे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प माऊली महाराज पठाडे (कर्जतकर) यांचे समाज प्रबोधनपर किर्तन होणार आहे.या कार्यक्रमाचे प्रतिमा पूजन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते
तर माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी,जेष्ठ
नेते प्रभाकर मजगे,जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे,तुकाराम बिराजदार यांची उपस्थिती राहणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प आबा महाराज कुरनूरकर हे राहणार आहेत.यासाठी ह.भ. प बाबुराव शिंदे महाराज कुरनूरकर यांचे सहकार्य मिळत आहे.तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमांचा
लाभ घ्यावा,असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने
करण्यात आले आहे.