राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोटमध्ये ३२३ जणांचे रक्तदान;मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
अक्कलकोट, दि.६ : शिवराज्याभिषेक दिन
व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त ३२३ जणांनी रक्तदान केले.अक्कलकोटच्या टिनवाला फंक्शन हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.शिबिराचे हे ३६ वे वर्ष आहे.आत्तापर्यंत १२ हजार बाटल्या रक्त संकलित झाल्या असून या माध्यमातून अनेकांना जीवदान मिळाले आहे. ही गरज ओळखूनच यावर्षी देखील कोव्हिड- १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात
रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला.या शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी आमदार सिद्धाराम
म्हेत्रे,सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे
अध्यक्ष धर्मराज काडादी, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे,माजी उपमहापौर दिलीप कोल्हे,जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, बिज्जू प्रधाने, बाळासाहेब वाघमारे,नगरसेवक बसलिंग खेडगी,अमोलराजे भोसले, बाळासाहेब मोरे , अविनाश मडीखांबे,प्रशांत बाबर,सुहास कदम,संगमेश्वर नागरपल्ली,मल्लिकार्जुन काटगाव,एजाज
मुतवल्ली, तहसीलदार बाळासाहेब सिरसट,
रेवण बंडगर ,शाम मोरे,अभय खोबरे,मानाजी माने,शिवसेना तालुकाध्यक्ष संजय देशमुख,
विलास गव्हाणे,शिवराज स्वामी,बाबा निंबाळकर,सिध्दप्पा कल्याणशेट्टी,
सुरेशचंद्र सूर्यवंशी, व्यंकट मोरे,राहुल काळे,बसवराज तानवडे, नननु कोरबु, अरुण जाधव ,सुनील खवळे,माणिक बिराजदार,शंकर व्हनमाने,मैनुद्दीन कोरबू,ज्ञानेश्वर बनसोडे आदी उपस्थित होते.दरम्यान आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील,प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील,अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेंजय भोसले यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिले.आज दिवसभर अक्कलकोट शहर आणि ग्रामीण भागातील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराला हजेरी लावून सिद्धे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या शिबिरासाठी सोलापूर ब्लड बँक, हेडगेवार रक्तपेढी आणि शिव शंभो ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. गेल्या ३५ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातो.मागच्या वर्षी कोरोनाचे संकट होते या काळात
रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासला.रक्तदानापेक्षा मोठे दान या जगात नाही म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर गरज ओळखून हा उपक्रम राबविला असल्याचे तालुकाध्यक्ष सिद्धे यांनी सांगितले. शिबिरानंतर संध्याकाळी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम शिबिर यशस्वी करण्यासाठी अविराज सिद्धे, स्वामीनाथ चौगुले, विशाल राठोड,नवनीत राठोड,बंटी पाटील, श्रीशेल चितली, राहूल राठोड,संजय जमादार, आकाश तुवर,सतिष सुरवसे,सागर सोमवंशी,यतिराज सिध्दे,
दर्शन चव्हाण,प्रकाश टाके,राजू लांडगे,
बसु पाटील,राजू भुजंगे,रशीद खिस्तके,योगेश नाईक नवरे,शिवकुमार यादव,दीपक लांडगे आदींनी परिश्रम घेतले.या रक्तदान शिबीरात रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्याचे आभार सुनिल सिध्दे यांनी मानले.
आरोग्य तपासणी
शिबीरालाही उस्फूर्त प्रतिसाद
तालुक्यातील बादोले गावातही सिध्दे यांच्या वाढदिवसानिमत्त शांतकुमार सलगरे यांनी आयोजित केलेल्या शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले.सोलापूर येथे त्यांच्या निवास स्थानी ४० जणांनी रक्तदान केले.अक्कलकोट येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरातही १३० जणांची तपासणी
करण्यात आली.