ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ सज्ज, भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजला !

 

अक्कलकोट : गुरुपोर्णिमेनिमित्त हजारों स्वामी भक्तांकरिता अन्नछत्र मंडळ सज्ज असून, उभी स्वामींची मुर्ती, महाप्रसादगृह, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, वाटिका व बालोउद्यान, शिवचरित्र धातू शिल्प प्रदर्शन हे पाहण्यासाठी स्वामी भक्तांची मोठी सोय करण्यात आली आहे. यात्री निवास, यात्री भवन, प्रशस्त वहानतळ स्वामी भक्तांनी गजबजले आहे
व फुलून गेले आहे.श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने बुधवार दि. १३ जुलै रोजी गुरूपौर्णिमे निमित्त सकाळी ७ ते ९ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा, सकाळी १० वाजता महानवैद्य माजी पालकमंत्री दत्ता भरणे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, अधिकराव रामाराव खुडे –पाटील (पालखी संयोजक कराड), गोरख दिवेकर (देणगीदार पुणे) व पुनीत बालन उद्योगपती पुणे यांच्या शुभहस्ते होणार असल्याचे माहिती प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी दिली.
बुधवार दि. १३ जुलै रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद, दु. ४ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी, आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाच्या मिरवणूकीचा दिंड्या व वाद्यांचा गजरात अतुल बेहरे पुणे यांच्या नांदब्रम्ह या ढोलपथकाच्या तालात आणि अमोलराजे लेझिम संघाच्या शानदार खेळाने शुभारंभ मराठी सिनेअभिनेता मुंबई स्वप्निल जोशी, आमदार अप्पुगौडा पाटील (कलबुरगी दक्षिण), भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीराजे पवार, सो.म.पा. नगरसेवक अमोलबापू शिंदे, सो.म.पा. नगरसेवक चेतन नरोटे, सो.म.पा. माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, सो.म.पा.मा.शिक्षण सभापती संकेत पिसे यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!