अक्कलकोट, दि.१३ : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी महाराज देवस्थानास १ लाख १ हजार रुपयाची देणगी चपळगावचे सरपंच तथा मनीषा ॲग्रो सायन्सचे प्रमुख उमेश पाटील यांनी दिली.ही देणगी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केली.यानिमित्त पाटील यांचा मंदिर समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना पाटील म्हणाले, स्वामी समर्थांची महिमा अगाध आहे.खूप दिवसांपासून इच्छा होती.आई – वडील स्वामी समर्थांची खूप भक्ती करतात.ती या देणगीच्या रूपाने पूर्ण केली आहे.यावेळी रोहिणी पाटील, विक्रांत पाटील, मनोज इंगुले, ज्ञानेश्वर कदम, सुरेश सुरवसे, विठ्ठल पाटील,रमेश शिंदे आदींची उपस्थिती होती.