गुरु मंदिरात गुरुपौर्णिमा पालखी सोहळा उत्साहात, डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले महाराज यांच्या हस्ते पादुका पूजन
अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट शहरातील गुरु मंदिर अर्थात बाळप्पा महाराज मठ येथे मोठ्या भक्ती भावाने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात देखील हजारो स्वामीभक्त सहभागी झाले होते.दरवर्षी हा उत्सव या ठिकाणी शिवपुरी संस्थानकडून साजरा केला जातो.यानिमित्त दिवसभरात शेकडो भाविकांनी दर्शन घेतले.तसेच महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.या सेवेचा लाभ घेऊन तृप्त मन तृप्त झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.गुरुमंदिरतील पादुकांची पालखी गुरुमंदिरातून निघून समाधी मठ आणि वटवृक्ष मंदिर करून परत गुरुमंदिरात नेण्यात आली आणि त्यानंतर भक्ती संगीत आणि पादुका पुजनचा कार्यक्रम पार पडला.गुरुमंदिरचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले महाराज व डॉ.गिरीजा राजीमवाले यांच्या हस्ते ‘श्री’ पादुकांचे अभिषेक व पूजन करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.यावेळी बोलताना डॉ. राजीमवाले म्हणाले,गुरु मंदिरला शेकडो वर्षाची परंपरा आहे.ही परंपरा आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत.यावेळी व्यवस्थापक विद्याधर पारखे,भूपतभाई व्होरा,आण्णासाहेब वाले,धनंजय वाळुंजकर,माधुरी बाग,वक्रतुंड औरंगाबादकर,पवन कुलकर्णी,
नितीन शिंदे,श्रेणीक पंडीत,गोविंदा गुर्जर,
चेतन दावनपल्ली,इरेश फसगे,आनंद कुंभार,
विशाल अनगले,परमेश्वर माळी,धोंडिबा नडगम
सचिन अनगले,अमित आहेरकर,बाळू पुजारी
अविनाश अनगले आदींसह सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.