ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गोकुळ शुगरकडून यंदा १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

अक्कलकोट, दि.८ : गोकुळ शुगरचा
यंदाचा हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.त्यापूर्वीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून २० तारखेपर्यंत तोडणी टोळ्या आणि वाहतूक यंत्रणा कारखाना स्थळावर दाखल होतील,अशी माहिती चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली.धोत्री (ता.दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज साखर कारखान्याच्या आठव्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते.
कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे त्यांच्या सुविध्य पत्नी प्रीती शिंदे,कार्यकारी संचालक कपिल शिंदे आणि त्यांच्या सुविध्य पत्नी श्वेता शिंदे, गणपत शिंदे आणि सुविद्य पत्नी कुसुम शिंदे या दांपत्यांनी होम हवन आणि विधिवत पूजा केली. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि तुळजाभवानी कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले.यावेळी बोलताना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले,गोकुळ शुगर कारखाना आमच्या हक्काचा आहे.या कारखान्याला चव्हाण परिवाराचे सदैव सहकार्य राहील. शेतकऱ्यांनी ऊस देऊन सहकार्य करावे.गतवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांची बिले वेळेवर दिली जातील.या सोहळ्यास कारखान्याचे संस्थापक बलभीम भाऊ शिंदे , अक्कलकोट पंचायत समितीचे माजी उपसभापती स्वामीराव पाटील तज्ञ संचालक विशाल शिंदे, अभिषेक शिंदे, युवराज शिंदे, अर्जुन शिंदे, अवनी शिंदे असा शिंदे परिवार उपस्थित होता.यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रदीप पवार , मुख्य शेती अधिकारी शेंडगे, शेती अधिकारी जहागीरदार, सरपंच कार्तिक पाटील,अभिजीत गुंड, अमोल होटकर,लाला राठोड, अभिनंदन गांधी, सिद्धाराम भंडारकवठे, सरपंच व्यंकट मोरे, राजू चव्हाण, उमाकांत गाढवे , उमेश पवार ,अरविंद जंगाले आदींसह परिसरातील नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूर्ण क्षमतेने ऊस
गाळपासाठी सज्ज

यावर्षी कारखान्याने १० लाख मेट्रिक टन गाळप ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.त्यासाठी मशिनरीची देखभाल व दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण झालेली आहेत.तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज असून पहिल्या दिवसापासून कारखाना पूर्ण क्षमतेने ऊस गाळपासाठी सज्ज आहे.शेतकऱ्यांनी ऊस देऊन सहकार्य करावे.

दत्ता शिंदे, चेअरमन गोकुळ शुगर

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!