ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लेटेस्ट न्यूज : पुणे पदवीधर मधून १६ तर शिक्षक मतदारसंघातून १५ जणांची माघार

 

सोलापूर,दि.१७ : राज्य विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघात एकंदर ६२ उमेदवार तर शिक्षक मतदार संघात एकंदर ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत . विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पदवीधर मतदार संघासाठी एकूण ७८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते . आज अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत त्यापैकी एकूण १६ उमेदवारांनी माघार घेतल्यानं आता ६२ उमेदवार शर्यतीत राहिले आहेत . शिक्षक मतदार संघात वैध ५० उमेदवारांपैकी १५ जणांनी माघार घेतल्यानं ३५ उमेदवारांमध्ये अंतिम लढत होईल . येत्या १ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ रोजी मतमोजणी केली जाणार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!