सचिन पवार
कुरनूर, दि.२३ : एकीकडे कोरोनाचा कहर संपताच दुसरीकडे पाळीव प्राण्यांसाठी धोक्याची घंटा सुरू झाली आहे. देशभरात थैमान घातलेल्या लंपी या रोगाने कित्येक जनावरे दागवत आहेत.याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. खबरदारी म्हणून कुरनूर ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून यावेळी गावातील १५० गाय व बैलांना लसीकरण करण्यात आले. या लसीकरण मोहिमेमुळे गाय व बैल यांना धोका निर्माण होणार नाही, असे सरपंच व्यकंट मोरे यांनी सांगितले.
यावेळी तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे, उपसरपंच आयुब तांबोळी, ग्रामसेविका रेखा बिराजदार,डॉ, संतोष कराळे, पशुसंवर्धन पर्यवेक्षक,मनोज वडगाव, राजू गवळी, सद्दाम पठाण,किशोर कासार,सुरेश बिराजदार,दशरथ बावडे, अमर मोरे, तुकाराम कांबळे, अजय शिंदे आदींसह शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून
या शिबिराचा लाभ घेतला.