दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह शिवसेनेतून बंड केलं होतं. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली होती. या प्रकरणानंतर शिवसेना आणि शिंदे गटाकडून न्यायालयात परस्परविरोधी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळं आता खरी शिवसेना कुणाची याचा फैसला आज होणार आहे. आजच्या सुनावणीत शिंदे-फडणवीस सरकारचं भविष्य अवलंबून असणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पुढे ढकलल्या जाणाऱ्या राज्यातील सत्तासंघर्षावर अखेर आज सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी विस्तारीत खंडपीठाची नियुक्ती केली होती. त्यानंतर मागच्या सुनावणीत कोणताही निकाल दिला नव्हता. त्यामुळं आज होणाऱ्या सुनावणी कोर्ट कुणाच्या बाजूनं निकाल देणार, याकडं देशाचं लक्ष असणार आहे.
शिवसेनेच्या चिन्हावर आणि पक्षावर जो दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता, त्यावर आणि कोर्ट निकाल देईल. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या निलंबनाची याचिका, विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांचे अधिकार आणि पक्षांतरबंदी कायदा अशा मुद्द्यांवर कोर्टात युक्तिवाद झाल्यानंतर निर्णय देण्यात येणार आहे