दिल्ली : एनआयए आणि महाराष्ट्र एटीएस पुन्हा ऍक्शन मोडवर येत पीएफआय विरोधात पुन्हा एकदा कारवाई केली आहे. दरम्यान पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्थानिक तपास यंत्रणांसह पुन्हा छापेमारी केली. तपास यंत्रणांनी आसाममधून ७ जणांना आणि कर्नाटकमधून १० जणांना अटक केली आहे. यामध्ये पीएफआय आणि एसडीपीआयच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. देशभरात आठ राज्यांमध्ये छापेमारी सुरू आहे. तसेच आसाममध्ये आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पीएफआयशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी सुरू केली. यावेळी सात जणांना अटक करण्यात आली.
औरंगाबाद एटीएस आणि पोलिसांनी मोठी कारवाई करत पीएफआयचे आणखी १३ ते १४ कार्यकर्ते ताब्यात घेतले. एकाच वेळी पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. औरंगाबाद पोलीस आणि एटीएसकडून रात्रभर छापेमारीची कारवाई सुरू होती.
सोलापूरमध्येही PFI विरोधात NIA ने कारवाई केली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. सोलापूरमधून NIA ने एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ताब्यात घेतलेल्या या व्यक्तीला NIA च्या पथकाने आपल्या सोबत चौकशीसाठी दिल्लीला नेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.