खरी शिवसेना कोणाची हे निवडणूक आयोगच ठरविणार.. कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया
दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत आज शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे, तर उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे पक्षचिन्हाची लढाई आता निवडणूक आयोगाच्या कोर्टातच लढली जाणार आहे.
कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.. एकनाथ शिंदे म्हणाले की, कोर्टानं जो निर्णय घेतला आहे त्याचा आदर करतो. लोकशाहीत बहुमताला महत्व असतं, बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभा आणि लोकसभेत बहुमत आमच्याकडे आहे. देशात जे काही निर्णय होतात ते कायदे, राज्यघटना यांच्याप्रमाणं होतं असतात. निवडणूक आयोग स्वतंत्र यंत्रणा आहे. काही निर्णय कोर्टात होतात, काही निर्णय निवडणूक आयोगात होतात. निवडणूक आयोगानं काही ऐकू नये,असं काही जणांना वाटत होतं. मात्र, सुप्रीम कोर्टानं आज निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा केला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.