ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पूल ओलांडताना पाच ग्रामस्थ पुराच्या पाण्यात गेले वाहून दैव बलवत्तर होता म्हणून सर्वजण बचावले…

सोलापूर : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याने गेल्या महिन्यात देशात अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरी भागातील नागरिकांना विविध प्रकारचे सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील नागरिक पाणी, वीज, रस्ते या मूलभूत सुविधांपासून अजूनही वंचित आहेत. देशातील ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पानी, सुरळीत विद्युत पुरवठा, चांगले रस्ते अजून मिळू शकले नाहीत. अशीच एक घटना बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी गावात घडली आहे.

पूल ओलांडताना पाच ग्रामस्थ पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी गावात घडली आहे. पुलावरुन नागरिक वाहून जातानाची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून सुदैवाने ग्रामस्थांच्या मदतीने सर्वजण सुखरूप वाचले असल्याची माहिती समोर आले आहे.

निखिल महादेव कुंभार, पोपट बाबुराव घाडगे, अनुसया पोपट घाडगे, दिलीप ताकभाते आणि प्रविण भारत क्षीरसागर अशी वाचलेल्या नागरिकांची नावे आहेत. गेल्या चार वर्षांपासून या पुलावरुन पाणी वाहत आहे. अनेक दिवसांपासून पुलाची उंची वाढवून देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. गावकऱ्यांनी तहसीलदार सुनील शेरखाने यांची भेट घेत वारंवार ही मागणी केली. मात्र प्रशासनाने याची दखल न घेतल्याने अखेर दुर्घटना घडली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!