ब्रेकिंग.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ”इतक्या” आमदारांना घेवून काँग्रेसमध्ये जाणार होते – शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा गौप्यस्फोट
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॉँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दहा ते पंधरा आमदारांना घेवून काँग्रेसमध्ये जाणार होते असा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहेत.. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कॉँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना असा दावा केला होता की, शिवसेनेकडून २०१४ सालीच सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव देण्यात आला होता. जेव्हा शिवसेनेच्या एक शिष्टमंडळाने कॉँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली होती त्या शिष्टमंडळात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ही समावेश होता, असे अशोक चव्हाण म्हणाले होते. अशोक चव्हाण यांच्या नंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी अशोक चव्हाण यांच्या वाक्यात तथ्य असल्याचे सांगितले आहेत.