पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मध्यमांशी संवाद साधला. माध्यम प्रतिनिधीनी काही दिवसांपूर्वी कॉँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोट संदर्भात प्रश्न विचारलं त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार बोलताना म्हणाले कि, शिवसेनेकदुन आमच्याकडे असा कोणताही प्रस्ताव कुणीही दिलेला नाही. राष्ट्रवादीला जर असा प्रस्ताव कुणी दिला तर पक्षप्रमुख म्हणून मला याची किमान माहिती तरी असते. राष्ट्रवादीचे सगळे निर्णय घेण्याचा आमच्या अन्य लोकांना अधिकार आहे. परंतु तरीही ते माझ्या कानावर महत्वाच्या गोष्टी घालत असतात. अशोक चव्हाण जे बोलले ते मी कधीही ऐकलं नाही असे देखील पवार म्हणाले.
युती सरकारच्या काळातच शिवनसेनेकडून राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस सोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला असल्याचा गौप्यस्फोट कॉँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यात एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश होता असे देखील चव्हाण म्हणाले होते. त्यांच्या या व्यक्तव्या नंतर खळबळ उडाली होती. राज्याच्या राजकणारनात देखील अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील अशोक चव्हाण यांच्या त्या व्यक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.