---Advertisement---

दसरा मेळाव्याआधी मुंबईतील राजकीय वातावरण तापलं, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : दसरा मेळाव्याआधी मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे.  शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे शिवाजी पार्कला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वांद्र्याच्या बीकेसी मैदानात दसरा मेळावा घेणार आहेत. या दोन्ही मेळाव्यांसाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते यायला सुरूवात झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होऊ नये,यासाठी पोलिसांचाही कस लागणार आहे.

मुंबईमध्ये या दोन दसरा मेळाव्याशिवाय देवी विसर्जन मिरवणुकाही होणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शिवाजी पार्क आणि बीकेसी मध्ये पोलिसांनी चेन सिस्टीममध्ये बंदोबस्त केला आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये समन्वय राहावा,यासाठी डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांचा व्हॉट्सऍप ग्रुपही बनवण्यात आला आहे. दोन्ही दसरा मेळावे आणि नवरात्र विसर्जनासाठी मुंबईत ३,२०० उच्च अधिकारी, १५,२०० पोलीस कर्मचारी,१,५०० एसआरपीएफचे जवान, १,००० होमगार्ड,२० क्युआरटी टीम आणि १५ बीडीडीएस टीमचा समावेश आहे.

राज्यातील राजकारणासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. शिवसेनेच्या इतिहासात दसरा मेळाव्यासाठी पहिल्यांदाच इतकी उत्सुकता ताणली गेली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आज सायंकाळी सुरू होणार आहे. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून शिवसैनिकांना आपल्याकडे खेचण्याची चढाओढ सुरू आहे.

राज्यभरातून शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. दसरा मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यातून १० हजार वाहने भरून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. यामुळे मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कस लागणार आहे.  पोलिसांवरील ताणही वाढणार आहे.  त्यामुळेच दसरा मेळाव्यातील वाहतूक व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबत पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बंदोबस्त करत असताना हलगर्जीपणा व पक्षपातीपणा न करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. पोलीस उप आयुक्त संजय लाटकर यांनी परिपत्रक जारी करत पोलीस दलाला हे आदेश दिले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!