मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखीन एक धक्का देणार? खासदार कृपाल तुमाने यांनी केला गौप्यस्फोट
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे, यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दसरा मेळाव्याच्या मंचावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखीन एक धक्का देणार आहेत का? हे आज संध्याकाळी समजणार आहे. खासदार कृपाल तुमाने यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले कि, दोन खासदार आणि पाच आमदार आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा धक्कादायक दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे. कृपाल तुमाने हे नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी कृपाल तुमाने हा दावा केला आहे.
ही वेळ आहे अनेक नव्या संकल्पांसह सीमोल्लंघनाची
हिंदूत्व आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, राज्यातील माय-बाप जनतेच्या सुखसमृद्धी आणि भरभराटीसाठी.
मा. बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आपण सगळे जमणार आहोत बीकेसी मैदानावर. सर्वांना विजयादशमीच्या, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. #चला_BKC pic.twitter.com/MZRtafQJ8U— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 5, 2022
मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीएच्या मैदानावर शिंदे गटाचा आज दसरा मेळावा होणार आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का देण्याची पूर्ण तयारी झाल्याचं बोलले जात आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर २ खासदार आणि ५ आमदार आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटातील रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या दोन खासदारांपैकी एक खासदार हा मुंबईचा असू शकतो. तर दुसरा खासदार हा मराठवाड्यातील असू शकतो, असा मोठा दावा तुमाने यांनी केला आहे. खासदार कृपाल तुमाने यांच्या वक्तव्यानंतर हे खासदार आणि आमदार कोण आहेत, याची चर्चा आता सुरू झाली आहे.