ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चनबसप्पा खेडगी यांचे समाजकार्यात अमूल्य योगदान ; जयंतीनिमित्त आयोजित शिबिरात १०५ जणांनी केले रक्तदान

अक्कलकोट : अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक उपाध्यक्ष चनबसप्पा खेडगी यांनी आयुष्यभर दानधर्म, शिक्षणसेवा आणि धर्मसेवेच्या माध्यमातून समाजाभिमुख कार्य केले. समाजाच्या जडणघडणीत त्यांचे अमूल्य योगदान असल्याचे मत अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी चे सेक्रेटरी सुभाष धरणे यांनी व्यक्त केले. अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक उपाध्यक्ष कै. चनबसप्पा खेडगी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उदघाट्न सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी हे होते. यावेळी व्हाईस चेअरमन अशोक हारकूड, संचालक ऍड. अनिल मंगरूळे, चंद्रकांत स्वामी, प्राचार्य डॉ. एस. सी. आडवीतोट, उपप्राचार्य प्रा. बसवराज चड्चण, पर्यवेक्षिका प्रा. वैदेही वैद्य उपस्थित होते.

प्रारंभी प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ. आडवीतोट यांनी प्रास्तविकातून चनबसप्पा खेडगी यांच्या जीवनकार्याची माहिती देऊन रक्तदान शिबिरासंदर्भात सकारात्मक आवाहन केले. यावेळी पुढे बोलताना धरणे म्हणाले, चन्नबसप्पा खेडगी यांचा दानधर्म आणि शिक्षणसेवेचा वारसा कै. शिवशरण खेडगी यांनी समर्थपणे पुढे नेला. तीच परंपरा चेअरमन बसलिंगप्पा खेडगी हे नेटाने चालवत आहेत. यातून समाजकल्याण साध्य होईल. असे मत व्यक्त केले. या रक्तदान शिबिरात राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. १०५ रक्तदात्यांनी रक्तदान करत या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला.

शिबीर यशस्वी करण्यासाठी रक्तदान शिबीर समन्वयक डॉ. गुरुलिंगप्पा धबाले, एन्. सी. सी. चे लेफ्टनंट डॉ. भैरप्पा कोणदे, प्रा. निलकंठ धनशेट्टी, प्रा. विलास अंधारे, वरिष्ठ विभाग एन्. एस. एस. कार्यक्रमाधिकारी डॉ. किशोर थोरे, कनिष्ठ विभाग कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रकाश सुरवसे, डॉ. गुरुसिद्धय्या स्वामी, प्रा. आनंद गंदगे, प्रा. संजय कलशेट्टी, डॉ. दत्तात्रय बिराजदार, प्रा. निलप्पा भरमशेट्टी, प्रा. श्रीमंत बुक्कानुरे, प्रा. संध्या इंगळे, प्रा. शिवाजी धडके, प्रदीप हिंडोळे, राजू चव्हाण, आदींसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले तर प्रा. संध्या इंगळे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!