पुणे : अडीच वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल महाविकास आघाडी सरकार कोसळून सध्या एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांच युतीचे सरकार अस्तित्वात आले आहे. शिवसेनेतिल बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदार गेले. या आमदारांना पाठिंबा देत भाजपने राज्यात सत्ता आणली. यासंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.
“दोन अडीच वर्षांपासून आपलं सरकार येईल असं सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो.” असे चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हंटले आहेत. यामुळे राहयातील सत्तानंतर नाट्यात भाजपचे काय भूमिका होती हे स्पष्ट होत आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले की, “सरकार आणण्यासाठी आम्ही योजना बनवत होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. ४० जणांना बाहेर काढणं सोपं नव्हतं. त्यासाठी वेळ लागणार होता. तसंच संधी येणंही महत्त्वाचं होतं. शेवटी ती वेळ साधली आणि आपलं सरकार आलं.” आस वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते, आमदार दीपक केसकर यांनी चंद्रकांत पाटील यांचा दावा खोडून काढले आहेत. आमचं असं काही प्लॅनिंग नव्हतं. आमचा उत्स्फूर्त उठाव होता. तो काही तत्त्वांसाठी होता. त्याबद्दल सविस्तर मी पत्रकार परिषदेत केला होता, असं वक्तव्य केसरकर यांनी केले आहेत.