ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाविकास आघाडी सरकारने बंद केलेली ‘’ही’’ योजना पुन्हा सुरू होणार, शेतकऱ्यांना मिळणार १२ तास वीज, देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा

अमरावती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातून मोठी घोषणा केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने देवेंद्र फडणीवीस यांनी सुरू केलेल जलयुक्त शिवार योजनेला स्थगिती दिली होती. सत्तानंतर या योजनेवरून आरोप-प्रत्यारोप देखील झाले होते. राज्यात अडीच वर्षात पुन्हा एकदा सत्तानंतर होवून देवेंद्र फडणवीस – एकनाथ शिंदे यांचे सरकार येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात मागील काळात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून रब्बीचे पीक वाढवण्याचा प्रयत्न केला. या योजनेमुळं 39 लाख हेक्टर जमीन रब्बी पिकाखाली आली. तसेच 27 टीएमसी पाणी थांबवू शकलो आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला. हे फायदे लक्षात घेऊन नव्या स्वरुपात ही योजना आणली जाईल. पुढच्या टप्प्यात गावंजलस्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्या पाण्याचा योग्य उपयोग गावात व्हावा आणि नैसर्गिक शेतीला चालना मिळावी हे ध्येय ठेवून ही योजना राबवायची असल्याचे फडणवीस म्हणाले. येत्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्याची घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!