ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आईच्या काळजात कट्यार घुसवली..! शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे जनतेला केलेले संबोधन

मुंबई : आज देखील अनेक जण भेटतात म्हणतात तुम्ही कुटुंबीयच आहात. आज पुन्हा फेसबुकच्या माध्यमातून. गद्दारी झाली मुख्यमंत्री पद सोडले तेव्हा पण आपण संवाद केला. सगळ देऊनही गद्दार गेले. आता जरा अति होऊ लागलय. मलाच मुख्यमंत्री व्हायचय इथं पर्यंत ठिक होत आता शिवसेनाप्रमुख व्हायला चालले. सगळ्यांना धन्यवाद दसरा मेळाव्यात विघ्न आणले. पण आपला झालाच. दोन मेळावे झाले अस म्हणतात एकीकडे पंचतारांकित तर दुसरीकडे निष्ठावंतांचा मेळावा दिव्यांग, नेत्रहीन सगळे शिवसैनिक होते त्यांना धन्यवाद. तुम्ही आलात ते का? कारण उध्दव बाळासाहेब ठाकरे म्हणून तुम्ही आलात. १९ जून १९६६ तो काळ आजही आठवतो. घरी मराठी माणसांची वर्दळ. मार्मिक होते वाचा आणि थंड बसा हे तेव्हाचे सदर. आजोबांनी बाळासाहेबांना विचारले संघटना काढायचे ठरवले का? आजोबांनी नाव दिले शिवसेना. पुढे हा ५६ वर्षांचा इतिहास आपल्या समोर. एक दिवस एक तगडा माणूस उभा ते दत्ताजी साळवी काही नसतांना लोक जुळत गेली. काहीच नव्हत केवळ महाराष्ट्राच्या हितासाठी माझा सिंहाचा खारीचा वाटा उचलणार म्हणून लोक जुळली. वसंतराव मराठे ठाण्यात निवडून आले, अनेक जण अनेकांची नावे. त्यातून शिवसेनेचा विजयरथ पुढे निघाला. पहिल्यांदा ४२ नगरसेवक.

अनेक जणांनी जीव पण गमावले, तुरुंगवास सोसला, पोलिसांशी संघर्ष त्यातून शिवसेनेचा महावृक्ष. काल निवडणुक आयोगाने चिन्ह धनुष्य बाण गोठावला. चाळीस डोक्यांच्या रावणांनी ते गोठवल. या लोकांच्या वृत्तीची चीड. आईच्या काळजात कट्यार घुसवली. त्यांच्या मागच्या महाशक्तीला जास्त आनंद कारण त्यांना जमल नाही त्यांनी शिवसेनेची लोक फोडून आनंद घेताहेत. या देशात हिंदू म्हणायची हिम्मत दिली तीच शिवसेना गोठावली काय आनंद मिळवलात. तुमचा आणि शिवसेनेचा संबंध काय? माझ्या आजोबांनी नाव दिलय, बाळासहेबांनी रुजवलय. आज अनेकांचे फोन .सकाळी ९-९.३० वाजता नारळ फुटला त्याचे तुषार अंगावर मला ते पाणी इतके भिजवले की अनेक जबाबदारी मी सांभाळल आज शिवसैनिकांच्या अश्रुने भिजलाय.

त्यांचा उद्देश त्यांना तरी समजला. एका जाहिरातीचा संदर्भ. यांचा उपयोग संपला की यांना फेकून देतील. मला खात्री आहे सगळेच काही स्वार्थी नाहीत हे दसरा मेळाव्यात सिध्द झाल. शिवसैनिकांना दमदाट्या इंदिरा गांधीनी जे केले नाही ते तुम्ही केलय ही बाळासाहेबांची आठवण. तेव्हाही त्रास झालाच पण तेव्हा काँग्रेसचे सरकार होते आज भाजपचे मग जे काँग्रेसने केले नाही ते तुम्ही करता. शिवसैनिकांना ज्यांनी तुम्हाला मोठे केले त्यांना छळताहात. मी डगमगलेलो नाही. माझा आत्मविश्वास आहे तुमच्या सारखे शिवसैनिक आहेत तुम्ही डगमगायचे नाही. अनेकांना फोन येतात. माझ आजही आव्हान आहे समोर या निवडणुकांना सामोरे या. तुम्हाला सगळ हवय पण बाळासाहेबांचा मुलगा नकोय.

काही काळासाठी चिन्ह गोठवलय. मला हा निकाल अनपेक्षित होता. १६ आमदारांचा निकाल लागेपर्यंत आयोगाचा निर्णय व्हायला नको होता. माझ्या कायद्यावर विश्वास आहे. तिथे न्याय मिळेल अशी खात्री.

आपण तीन चिन्ह दिली आहेत त्रिशूळ, उगवता सूर्य, धगधगती मशाल. तीन नावे दिली शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधन कार ठाकरे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे. आदेशाप्रमाणे चिन्ह नाव दिलय लवकरात लवकर आम्हाला नाव द्यावे. आयोगाने आपण दिलेले पर्याय जाहीर केले पण गद्दारांनी काय दिलय ते अद्याप सांगितलेले नाही. जनता सर्वोच्च आहे. आम्हाला त्यांच्या दरबारात जायचे आहे म्हणून निवडणुक आयोगाने लवकरात लवकर आम्हाला चिन्ह आणि नाव द्यावे. आज कोजागिरी आहे रात्र वैऱ्याची आहे जागृक राहा. आज वेळ निघून गेली की कुणी आपल्याला कुणी हरवणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!