ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी अक्कलकोट तालुक्यात विकासाची गंगोत्री आणली ; वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमदार विजयकुमार देशमुख यांचे प्रतिपादन

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.९ : सर्व पक्षीय नेत्याबरोबर सलोख्याचे संबंध ठेवुन जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन विकासाची गंगोत्री आणली असुन त्यांचे कार्य अनुकरणीय व स्तुत्य आहे.तानवडे आणि अक्कलकोट तालुका हे विकासाचे समिकरण बनले आहे आणि ते यापुढेही कायम राहील,त्यांना आमचा पाठींबा असेल, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले.तानवडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरवळ येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

भैरवनाथ सांस्कृतिक भवन येथे म.नि. प्र अभिनव शिवलिंग महास्वामी (मादन हिप्परगा) यांच्या दिव्य सानिध्यात व तालुका भाजपचे माजी अध्यक्ष मल्लिनाथ स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बसलिंग खेडगी, नगरसेवक महेश हिंडोळे, राजशेखर मसुती, सुनिल बंडगर, अविनाश मडिखांबे, सरपंच विलास सुरवसे, श्रीकांत भैरामडगी, बसवराज काका तानवडे, राम मातोळे, शेखर कलकुटगे, राजेश राठोड, विजय साखरे, सौ यमुनाबाई काळे, बाळासाहेब भोसले, सतिश कणमुसे, सोनु गायकवाड, सिद्धु रायगुंडे, शंकर गोदे, माणिक धायगुडे, नागनाथ सुरवसे सर, अबुबकर शेख, चिदानंद कवडे, मोनेश नरेगल,सुभाष रेड्डी, सिद्धाराम बिराजदार इ मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ संपन्न झाला. यावेळी वागदरी जि प माजी सदस्य आनंद तानवडे यांचा वाढदिवसानिमित्त राजकिय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

पुढे बोलताना देशमुख पुढे म्हणाले की, आनंद तानवडे यांनी विकास कामात राजकारण केले नाही. सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेवुन सर्वागिण विकास केला आहे. मोठ्या प्रमाणात निधी मिळवुन दिला आहे. त्यामुळेच त्यांच्या कार्याची पावती देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे स्पष्ट केले.

याप्रसंगी भीमा पारशेट्टी, सुभाष रेड्डी, ज्ञानेश्वर पाटील, अशोक बंदीछोडे, सुुशील फुलारी,नागेश ढंगे, सचिन घुगरे,घलय्या स्वामी, विठ्ठल कत्ते,शानप्पा मंगाणे, मल्लू फुलारी,लिंग्रज मठापती,प्रकाश पोमाजी,प्रकाश घोदे,मल्लु बिराजदार,जाफर जमादार, बसवराज कारभारी,रमेश चिडगंपी,अप्पू देवकर,महमद मुल्ला,राजु ढंगापुरे,हुसेनी कारंजे, राजेंद्र घोदे,शाबुद्दीन शेख, धनराज बिराजदार व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विकास आणि आनंद या दोन्ही गोष्टीची सांगड घालत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे नियोजन अजित व्हदलुरे,दीपक तानवडे,सिद्धाराम पालापुरे,आसिफ शेख,नाना जगताप, मशाक मुल्ला,काडप्पा तानवडे,संगप्पा चानकोटे,दिपक कवडे,बालाजी बंदीछोडे ,राजू राठोड,सुनिल आवळे यांनी केले होते.यावेळी रफिक मुल्ला यांचे हज यात्रा केल्याबद्दल आमदार देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी स्व. शिवशरण खेडगी आणि संतोषी बाळासाहेब मोरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड अमितकूमार कोतमिरे आणि बळवंत जोशी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!