मुंबई : शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व येथील विधानसभेच्या जागेसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला काँगेस, राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा राहणार असून महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढवेल, अशी घोषणा आज तिन्ही पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत रंग शारदा येथे करण्यात आली.
कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल ‘मातोश्री’ निवास स्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पटोले यांनी आम्ही शिवसेने सोबत आहोत असे पत्रकारांना सांगितले. आमचा हात निश्चितच त्यांच्या सोबत राहील. अडचणीतील मित्राला मदत करणे हाच आमचा धर्म आहे, असे नाना पटोले म्हणाले. यावेळी मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप, अमित देशमुख, प्रवक्ते राजू वाघमारे, शिवसेना सचिव विनायक राऊत, विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, ऍड अनिल परब, राष्ट्रवादीच्या राखी जाधव उपस्थित होते.
शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. १३ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, असे शिवसेना विभाग प्रमुख अॅड. अनिल परब यांनी सांगितले.