मुंबई : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर शिवसेनेतर्फे रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी असून त्यांना निवडणूक लढवण्यापूर्वी सेवेचा राजीनामा देणं गरजेचं आहे. लटके यांनी नियमांच्या अधीन राजीनामा दिला होता, मात्र त्यांच्या राजीनाम्याची फाईल फिरवण्याचा खेळ महापालिकेत सुरू आहे असा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला आहे. मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.
निवडणूक अर्ज भरायला फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. ऋतुजा यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना आपल्या गटात खेचण्यासाठी शिंदेगटाचा हा प्रयत्न सुरू आहे, आम्ही याचा निषेध करतो असे परब यांनी म्हटले आहे. “तातडीचा प्रश्न असल्याने आम्ही न्यायालयात गेलो आहोत. दुपारी आम्ही हे प्रकरण न्यायमूर्तीं समोर मांडू आणि या प्रकरणी कोर्टाकडे न्याय मागू. ऋतुजा यांचा राजीनामा तत्काळ मंजूर करावा अशी मागणी आम्ही न्यायालयाकडे केली आहे.” असे परब यांनी सांगितले.
ऋतुजा रमेश लटके या महापालिकेत लिपिक म्हणून काम करतात. निवडणूक लढवण्याचा आम्ही त्यांना सांगितल तेव्हा 2 सप्टेंबर 2022 रोजी त्यांनी पदाचा राजीनामा दिल होता. महापालिकेकडून त्याला कोणताही उत्तर देण्यात आला नाही. 2 ऑक्टोबरल म्हणजेच एक महिना संपल्यानंतर जेव्हा त्या राजीनामा आणायला गेल्या त्या दिवशी त्यांना सनागण्यात आल की, तुम्ही चुकीच्या पद्धतीने राजीनामा दिल आहे, त्यामुळे तो मंजूर करता येणार नाही. म्हणू त्यांनी 3 ऑक्टोबरला नव्याने राजीनामा दिला होता. मुंबई महापालिकेच्या सेवा शर्तीमध्ये राजीनाम्याबाबत म्हंटल आहे की, एक महिना अगोदर सूचना द्यावी लागते. ऋतुजा यांनी ती दिली होती, मात्र ती स्वीकारली गेली नाही.
3 ऑक्टोबरला ऋुतुजा यांनी पुन्हा राजीनाम्याची सूचना दिली होती, मात्र एक महिना होत नाहीये. सेवाशर्तींमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की, एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत नसेल तर एक महिन्याचा पगार तुम्हाला कोषागारात जमा करावा लागतो. ऋुतुजा यांच्या विरोधात कोणतीही शिस्तभंगाची कारवाई नाही, त्यांची महापालिकेची कोणती देणीही बाकी नाहीत. त्यांनी सगळी कागदपत्र महापालिकेला सादर केली. त्यांची नाहरकत प्रमाणपत्रे आणि सगळी कागदपत्रेसही झाली. आणि ही फाईल तयार आहे मात्र महापालिका आयुक्तांवर दबाव आहे की हा राजीनामामंजूर करू नये” असा आरोप अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
अनिल परब हे महापालिका आयुक्तांना 3 वेळा भेटले होते. मात्र ते दररोज ते टोलवा-टोलवी करत असल्याचा आरोप परब यांनी केला आहे. आयुक्त वेगवेगळी कारणे सांगत आहेत. वरून दबाव असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. आणि त्यामुळेच हा राजीनामा मंजूर होत नाहीये असं परब यांनी म्हटले आहे. परब यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, खरंतर हा राजीनामा आयुक्तांकडे जाण्याचा प्रश्नच नाही कारण ऋतुजा लटके या ‘क’ वर्गात आहेत. त्यांचा राजीनामा हा सहआयुक्त स्तरावरच मंजूर होतो. मी सहआयुक्त मिलिंद सावंत यांनाही भेटलो. मात्र फाईल फिरवण्याचा खेळ महापालिकेत सुरू आहे. राजीनामा जाणून-बुजून मंजूर करायचा नाही असं तंत्र त्यांचं ठरलं असून आम्ही ज्या बातम्या पाहतोय, ऐकतोय त्यानुसार शिंदे गट ऋतुजा यांच्यावर दबाव टाकतोय की तुम्ही आमच्याकडून लढणार असाल तरच तुमचा राजीनामा मंजूर होईल असा आरोप परब यांनी केला आहे. ऋतुजा यांना मंत्रिपदाची ही ऑफर देण्याचा प्रयत्न सुरू असल्या चे कळत असल्या चे परब म्हणाले.