---Advertisement---

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधीच मल्लिकार्जून खरगे हे वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत

Follow Us:
---Advertisement---

भोपाळ : मल्लिकार्जून खरगे हे कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी देशातील विविध भागांमध्ये जाऊन पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुक आधीच खरगे एका वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत आले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना मल्लिकार्जून खरगे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘आमच्याकडे एक म्हण आहे, बकरी ईदमध्ये वाचू तर मोहर्रममध्ये नाचू, आधी माझी निवडणूक तर संपू द्या.’, असं वक्तव्य केले आहेत. खरगे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

मुस्लिमांची धार्मिक भावना दुखावणारं हे वाक्य असल्याचं सांगत भाजप नेत्यांनी खरगेंना धारेवर धरलं आहे. मोहर्रम हा उत्सवाचा नव्हे तर दुखवट्याचा महिना असतो, त्यामुळं खरगे यांनी केलेल्या वक्तव्यामुळं जगभरातील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचं सांगत पूनावाला यांनी खरगेंवर टीका केली आहे. तर दुसरीकडे भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी कॉंग्रेसला आस्तित्त्व टिकवणं कठीण झाल्याची टीका केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!