बंगळुरू : गुजरातच्या गोध्रा येथे घडलेल्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व ११ कैद्यांची सुटका करण्यात आली. या सर्वांची गुजरात सरकारच्या माफी योजने अंतर्गत तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. गुजरात सरकारच्या या निर्णया विरोधात सादर केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेत राज्य सरकार व सर्व दोषींना नोटीस जारी केल्या होत्या. यावर आज गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयाने निवेदन सादर केले. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
लाल किले से महिला सम्मान की बात लेकिन असलियत में 'बलात्कारियों' का साथ।
प्रधानमंत्री के वादे और इरादे में अंतर साफ है, PM ने महिलाओं के साथ सिर्फ छल किया है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 18, 2022
लाल किल्ल्यावरून महिलांच्या सन्मानाची चर्चा होते, परंतु प्रत्यक्षात ते बलात्काऱ्यांच्या समर्थनार्थ उभे आहेत. पंतप्रधानांची आश्वासने आणि हेतू यात स्पष्ट फरक आहे. पंतप्रधानांनी महिलांची फसवणूक केली, अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
देशभर गाजलेल्या बिल्किस बानो गँगरेप आणि हत्याप्रकरणात जन्मठेप भोगून तुरुंगातून सुटलेल्या ११ नराधमांचे गुजरात सरकारतर्फे चक्क मिठाई भरवून, औक्षण करून, गळाभेट आणि पाय धरून, अंगावर फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. गँगरेप व हत्येच्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींच्या या स्वागताचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
२००२ साली गुजरातमध्ये गोध्रा दंगल उसळली, त्याचदरम्यान बिल्किस बानो गँगरेप व हत्या प्रकरण घडले. या प्रकरणात न्यायालयाने ११ आरोपींना दोषी ठरवून जन्मठेप सुनावली होती. ही शिक्षा भोगल्यानंतर सर्व नराधमांची स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्टला गुजरातमधील तुरुंगातून सुटका करण्यात आली.