पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ ऑक्टोबरला व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशातील तरुणांशी संवाद साधणार, ”हे” आहे कारण ..!
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ ऑक्टोबरला व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशातील तरुणांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान दिवाळीनिमित्त देशभरातील ७५ हजार तरुणांना नोकरीची भेट देणार आहेत. त्यावेळी ७५ हजार तरुणांना नोकरीच्या नियुक्तीचे पत्र दिले जाणार आहे. या नोकऱ्या वेगवेगळ्या मंत्रालयात दिल्या जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून महिन्यात म्हटलं होतं की, पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत दहा लाख नोकऱ्या दिल्या जातील. यात संरक्षण, रेल्वे, पोस्ट, गृह, सीआयएसएफ, कामगार आणि रोजगार, सीबीआय, कस्टम, बँक, सीएएफ इत्यादींचा समावेश आहे.