---Advertisement---

भाजपचे माजी आमदार संजय देशमुख यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बांधले शिवबंधन !

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या संजय राठोड यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांना आगामी निवडणुकीत शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी चहूबाजूंनी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी पोहरादेवी गडावरील महंत सुनील महाराज यांना शिवसेनेत आणून उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्याविरुद्ध पहिली खेळी केली. त्यानंतर आता दिग्रसचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री संजय देशमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. संजय देशमुख यांचा ठाकरे गटातला प्रवेश संजय राठोड यांच्या समोरच्या आव्हानात भर टाकणारा, तर भाजपला धक्का असल्याचं मानलं जात आहे. संजय देशमुख यांच्या शिवसेनेतल्या प्रवेशामुळे दिग्रसची समीकरण बदलणार असल्याचं म्हटलं जात आहे.

पोहरादेवी गडावरील महंत सुनील महाराज यांचा ठाकरे गटातला प्रवेश महत्त्वाचा मानला गेला. आधी बंजारा समाजाला आपल्या बाजूनं करण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला आणि त्यानंतर आता संजय देशमुख यांचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे ठाकरेंची ही खेळी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात यशस्वी ठरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

दिग्रस मतदारसंघातील राजकारणात संजय राठोड आणि संजय देशमुख महत्त्वाचे नेते आहेत. संजय राठोड आणि संजय देशमुख दोघेही मूळ शिवसैनिक आहेत. दोघांचा राजकीय प्रवासाची सुरूवात शिवसेनेतून झाली आहे. संजय राठोड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. त्याचबरोबर संजय देशमुख यांनीही शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम केले आहेत. शिवसेनेकडून संजय राठोड यांना झुकतं माप दिलं गेल्यानंतर संजय देशमुख यांनी वेगळा मार्ग पत्करला होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!