ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काँग्रेसला मोठा धक्का..! केंद्र सरकारने केला राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द

दिल्ली : सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी फाउंडेशनला मोठा धक्का बसला आहे, केंद्र सरकारने राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द केला आहे. यामुळे आता राजीव गांधी फाउंडेशनला परदेशातून निधी मिळणार नाही. तसेच राजीव गांधी फाउंडेशनला आतापर्यंत जे पैसे मिळाले आहेत त्याचीही चौकशी होईल. काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.

१९९१मध्ये स्थापन झालेल्या RGF ने १९९१ ते २००९ पर्यंत आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला आणि मुले, अपंगत्व समर्थन इत्यादींसह अनेक गंभीर समस्यांवर काम केले आहे. राजीव गांधी फाउंडेशनवर पहिल्यांदा २०२० मध्ये आरोप करण्यात आले होते. या फाउंडेशनला चीनमधून ९० लाख रुपये मिळाल्याचं म्हटलं होतं. कायद्यातील नियमांचे उल्लंघन करत हा निधी मिळाल्याचं म्हणत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरू केली होती. अखेर एफसीआरएने राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!