मुलीला आयटम म्हणणं लैंगिक शोषणा पेक्षा कमी नाही ! पोक्सो न्यायालयाने ठोठावलं एका तरुणाला दीड वर्षांची शिक्षा
मुंबई : एखाद्या मुलीला आयटम असं म्हणून बोलवणं एखाद्या लैंगिक शोषणाहून कमी नाही, असं म्हणत पोक्सो न्यायालयाने एका आरोपीला दीड वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. एका १६ वर्षांच्या मुलीवर अश्लील टिप्पणी करण्याच्या आरोपाखाली ही शिक्षा ठोठावण्यात आली. ही घटना २०१५ मधील आहे.
पीडिता शाळेतून घरी जात होती. तेव्हा वाटेत या तरुणाने तिचे केस ओढून तिला आयटम असं संबोधलं होतं. या प्रकरणी आपल्याला चुकीच्या आरोपांखाली अडकवलं गेल्याचा आरोप आरोपीने केला होता. कारण, पीडितेच्या पालकांना त्यांची मैत्री मान्य नव्हती, असं आरोपी तर्फे सांगण्यात आलं होत.
मुलीने सांगितले की, जे व्हा त्याने माझ्यासोबत असे केले तेव्हा मी त्याला धक्काबुक्की केली आणि असे करू नकोस असे सांगितले. यानंतर आरोपीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि मला हवे ते करेन असे सांगितले. अल्पवयीन मुलीने लगेच १०० नंबर डायल केला. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी पळून गेले होते. यानंतर मुलीने वडिलांना घटनेची माहिती दिली.