ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मागडी तालुक्यातील कंचूगल बंडेमठाच्या पीठाधीशांनी केली आत्महत्या

रामनगर : तीन महिन्यांपूर्वी कडले मठाच्या स्वामींनीसुद्धा गळफास घेत आत्महत्या केली होती ही घटना अजून ताजी असताना रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील कंचूगल बंडेमठाच्या पीठाधीशांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या स्वामीजी यांचे नाव बसवलिंग स्वामीजी असं आहे. दिवाळीच्या दिवशी स्वामींच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. बसवलिंग स्वामी यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्ये आधी तीन पानांची सुसाइड नोट लिहिल्याचं आढळून आलं आहे.

मी कुणाचे कधीच वाईट चिंतले नाही. काही जणांकडून मला धमक्या देत आहेत सोबतच’ माझ्याबाबत काहीजण चुकीचा प्रचार करत आहेत. असे सुसाइड नोटमध्ये लिहिले आहेत.

रामनगर जिल्ह्यात मागडी तालुक्यात कंचूगल बंडेमठ हा प्रसिद्ध मठ आहे. या मठाची मालमत्ता पन्नास कोटी रुपयांहून अधिक आहे. या मठाचे भक्तही मोठ्या संख्येने आहेत. मठाकडून शाळा आणि महाविद्यालय सुद्धा चालवण्यात येते. आपल्यावरील आरोपामुळे प्रतिष्ठेला धक्का बसेल म्हणून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!