तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२४ : दिवाळी निमित्त अक्कलकोट तालुका चपळगाव येथे शासनाच्यावतीने गरिबांची दिवाळी गोड
व्हावी याकरिता शंभर रुपयांमध्ये दिवाळी किट ही योजना यावर्षी राबविण्यात आली.
या उपक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर चपळगाव येथे साखर, रवा, दाळ, बेसन इत्यादी वस्तू
गरीब शिधाधारकांना चपळगाव बृहत विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तथा भाजपा अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष खंडाप्पा वाले, सोसायटीचे संचालक कुमार दुलंगे,राजू भंगे, पंडित भूसुणगे यांच्यासह इतर सोसायटी सर्व संचालक मंडळ ,शॉप मॅनेजर महादेव रामपुरे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.