ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तो दिवस लांब नाही..! पाकव्याप्त काश्मिर संदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा विधान..!

काश्मिर : शौर्य दिनाच्या निमित्तानं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मिरच्या बडगाम जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी बोलताना पाकव्याप्त काश्मीर संदर्भात मोठ विधान केले आहे. त्यामुळं आता काश्मिर प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. पाकव्याप्त काश्मिरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच संधर्ष झाल्याचं पाहायला मिळाली आहे. परंतु आता पाकव्याप्त काश्मिर लवकरच भारतात सामील होईल, असं मोठं विधान देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहेत.

पाकव्याप्त काश्मिरमधील लोकांच्या नागरी हक्कांचं उल्लंघन केलं जात असून त्यांचा दु;ख आम्ही समजू शकतो. दुसरीकडे लडाख आणि भारतातील काश्मिर नव्या क्षितिजाच्या आणि विकासाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. त्यामुळं आता तो दिवस फार लांब नाही, पाकव्याप्त काश्मिर भारतात असेल, असंही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

पुढे बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, जगातील सर्वोत्तम लष्कर म्हणून भारतीय सैन्याची ओळख आहे. पाच ऑगस्ट २०१९ रोजी अखंड काश्मिर बनवण्याची मोहीम आपण सुरू केली आहे. जोपर्यंत पाकव्याप्त काश्मिर, गिलगिट आणि बाल्टिस्तान पुन्हा भारतात सामील होणार नाही, तोपर्यंत ही मोहीम पूर्ण होणार नसल्याचं संरक्षणमंत्री म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!