ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनातून मिळणार भारताला मोठा दिलासा ; ‘कोव्हिशील्ड’ची लस फेब्रुवारी महिन्यात होणार वितरीत

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचा जीव गेला आहे. दरम्यान, कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी जगभरात कोरोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातच कोरोना लस बनवणारी कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी जनतेला आनंदाची बातमी दिली आहे. ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केलेली ‘कोव्हिशील्ड’ ही लस फेब्रुवारी महिन्यात भारतात वितरीत व्हायला सुरुवात होणार असल्याची माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे.

त्याचसोबत कोरोना लसीचे २ डोस जनतेला परवडणाऱ्या किंमतीत मिळणार आहे. या लसीची किंमत 500 ते 600 रूपये इतकी असणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटामुळे तणावाखाली असलेल्या भारतीयांना खूप मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

भारतात कोरोना लसीच्या साठवणूकीची व्यापक स्वरूपात तयारी केली जात आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार अनेक राज्यांमध्ये कोल्ड स्टोरेजची व्यवस्था पाहिली जात आहे. यासाठी केंद्र सरकारला राज्याकडूनही मदत मिळत आहे.

दरम्यान, हि लस सामान्य जनतेसाठी मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून उपलब्ध होईल. ही लस साठवून ठेवण्यासाठी 2°C ते 8°C अंश सेल्सिअस तापमानाची गरज असेल. तर या लशीच्या एका डोसची किंमत 500 ते 600 रुपये असेल, अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली.

सध्याच्या घडीला आम्ही महिन्याला 50 ते 60 कोटी लशींची निर्मिती करत आहोत. फेब्रुवारी महिन्यापर्यंती ही क्षमता 100 कोटींपर्यंत वाढवण्यात येईल. देशातील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी 2024 पर्यंतचा कालावधी लागेल, असा अंदाज अदार पुनावाला यांनी वर्तविला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!